॥ हरे कृष्ण ॥
मी माझ्या ब्लॉग साठी Welcome Screen चा logo कसा असावा याचा विचार करत होतो. श्रीकृष्ण आणि त्यांच्या मायेच्या पसाऱ्याचे प्रतीक म्हणजे मोरपीस या दोन गोष्टी डोक्यात घोळत होत्या.
इंस्टाग्राम वर ideas शोधण्यास सुरुवात केली. त्यातून खालील मंडाला कलेमध्ये बनवलेले हे चित्र अगदी मनात उतरले.
त्याच्या मूळ कलाकारास संपर्क करून त्याची किंमत विचारली आणि त्याची "डिजिटल आवृत्ती मिळेल का?" याबद्दल चौकशी केली. तिने मुळात हे चित्र कागदावर रेखाटले असल्यामुळे त्याच्या रंगसंगतीत हवा तसा बदल करून मागणे थोडे कठीणच होते. मी सहज बोलता बोलता ते चित्र आकांक्षाला दाखवले आणि स्मितहास्य करून "मी करू शकते हे iPad वर Procreate ॲप मध्ये!" म्हणून तिची हे चित्र साकार करण्याची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला त्यातील बारकावे पाहून "हे iPad वर apple पेन्सिलने काढता येईल का?" याबद्दल मी थोडा साशंकच होतो. पण वेळ मिळेल तस हळू हळू करत तिने २ दिवसात चित्र पूर्ण केले आणि मी पुन्हा एकदा थक्क होऊन पाहतच राहिलो!
एकीकडे या चित्राच्या मूळ कलाकारास हे चित्र iPad वर पुनर्निर्मित केल्याचे कळवले आणि हे चित्र विकून पैसे कमवण्याचा आमचा उद्देश नाही हे सुद्धा स्पष्ट केले.
मला या चित्राकडे पाहताना श्रीकृष्ण मोरपिसाच्या पुढे उभे आहेत, असा हे 3D चित्र असल्याचा भास होतो. तुम्हालापण होतो का ?
🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏