top of page
Writer's pictureNayanesh Gupte

बानेरघट्टा नॅशनल पार्क

२०१३ ते २०१५ या काळात ३-४ वेळा जाणं झालं आणि त्यानंतर आज. तसं तर घरापासून तासाभरावर. यावेळी फारसे फोटो काढले नाहीत. त्याऐवजी अयांशला सफारी मधून फिरवताना त्याचे आणि प्राण्यांचे भाव टिपण्याचा प्रयत्न करत होतो.


एकंदर सर्वच प्राणी मानवाला आणि त्याच्या वरवरच्या पाहूणचाराला पार कंटाळून गेले आहेत, असचं काहीसं वाटतं होतं. सफारी मधून फिरताना ते मोकळे आणि आपण पिंजऱ्यात असा आविर्भाव आणण्याचा फसलेला केविलवाणा प्रयत्न त्या प्राण्यांच्या चेहऱ्यावर जाणवतो. पण नाईलाजाने ते पण दुर्लक्षच करायला शिकले असावेत असं वाटलं. आपण त्यांना कुतुहुलाने कितीही जवळून निरखायच्या प्रयत्नात असलो तरी ते मात्र एका वेगळ्या अलिप्त विश्वात गढून गेलेले. नॅशनल पार्क तसं त्यांना मानवेल असं सगळं नैसर्गिक भूभागातच वसलेलं. पण इतर प्राण्यांचा, माणसाचा गंध जाणवत असूनही जेंव्हा त्यांच्या पासून न पळता येत न त्यांना गिळता येत तेंव्हा ती कळकळ, तळमळ जाणवून त्यांचं येऱ्या झाऱ्या घालणं, दबकुन राहणं पण त्यांच्या मुक भाषेतून खूप काही बोलून जातं.


आपली पण परिस्थिती काही अशीच असते ना? कधी कधी मनात खूप काही असतं, आपलं आयुष्य कसं असावं, कसले बंध पाश नसावेत असं वाटतं. हे पाश नसते तर स्वच्छंदी जीवन नक्की कसं असतं? पण कर्मयोग्याच जीवन कितीतरी कर्मांच्या बंधनात अडकलेलं असतं हेच काय ते स्वीकारलेले सत्य!


अयांश त्या प्राण्यांना अगदी ओळखीचे कोणी असल्यासारखं समोर आले की त्यांना "Hi" आणि पुढे गेलो की त्यांना "Bye bye, see you!" करून चालला होता. ना excitement, ना भिती, ना आकर्षण. त्याला आपण आपल्या आई बाबांसोबत असल्याचाच काय तो आनंद!


बाकी weekend ला बाहेर पडून निसर्गाशी कुठेतरी जोडले गेलो. त्यातलं सळसळत चैतन्य खूप काही बोलत असतं, ते ऐकलं, पाहिलं, अनुभवलं!


- श्रीकृष्णार्पणमस्तु



4 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page