श्रीपाद प्रभू चरित्रामृतात ते शंकर भट्ट यांच्याकडून लिहून घेतात - ''खरे तर असे दत्तविधानच आहे की निषिध्द पदार्थाने रोग बळावतात परंतु आश्चर्य असे की अद्भूत अशी महतकार्ये कांही न येणाऱ्या सामान्य व्यक्तीकडून करवून घेण्याचा श्रीपाद प्रभूंचा नित्य विनोदी स्वभाव आहे. हे त्यांच्या दिव्य शक्तीचेच निदर्शन आहे.''
स्वामी आपले लाड स्वतःच पुरवून घेतात हेच खरं. आपण पण फक्त सेवा करण्याची ईच्छा बाळगावी आणि निमित्तमात्र व्हावं. नाहीतर अचानक "क्ले पासून हा मुकुट घडवायचा" असं आकांक्षाच्या मनात येणं आणि ते तिच्याकडून स्वहस्ते पूर्णत्वास जाणं म्हणजे ही त्यांची ईच्छा त्यांनीच पूर्ण करून घेण्यासारखे आहे. स्वामींनी मुकुट धारण केल्यावर ते मुकूटधारी लोभसवाणे रूप पाहून डोळ्यासमोर विठ्ठलाचं दर्शन झाल्याचा आभास निर्माण झाला. अगदी तेच स्मितहास्य!
विठू माऊली तू माऊली जगाची... जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची!
Blessed 🙌