top of page
Writer's pictureNayanesh Gupte

रिकामटेकडा

आपल्याकडे अत्यंत उपहासाने वापरला जाणारा हा शब्द! "मी काय रिकामटेकडा आहे का?", "तो काय रिकामटेकडाच असतो!". पण असतं का इतकं सोप्प रिकामटेकडा असणं. काही नाही तर मनात काही ना काही विचारांचं काहूर माजलेलच असतं. अगदी रिकाम दिसणारं मडक पण कधी रिकामं नसतं. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंच महाभूते म्हणून ओळखली जातात. त्या रिकाम दिसणाऱ्या मडक्यात पण आत वायू, आकाश यांनी ती रिकामी जागा भरकेलीच असते. आपल्या दृष्टीला जाणवत नसलं तरी त्यांचं अस्तित्व हे असतच. मडक फुटलं की त्या मडक्याच्या आतलं आणि बाहेरच आकाश एकरूप होतं.


पहाटे किंवा इतर कोणत्याही वेळी मेडीटेशन करणाऱ्या कोणालाही विचारा. काय होतं त्या मेडीटेशन मध्ये? मनाला शांती मिळावी म्हणून आज प्रत्येक जण योगा, ध्यान, साधना या सगळ्यांच्या मागे पळतो. कारण या विचारांपासून मुक्ती हवी असते. आयुष्यातली सगळी उलाढाल ही फक्त आणि फक्त मनाला शांती मिळावी या एकाच कारणासाठी असते. फक्त ती मिळवण्याचे मार्ग प्रत्येकाच्या मते वेगवेगळे असतात.


लोक म्हणतात शून्यात ध्यान लावून साधना करावी लागते. पण त्याचा अर्थ उलगडत नाही. कारण शून्य होणं म्हणजेच रिक्त किंवा रिकाम होण. विचारांनी आणि आपल्या स्वतःच्या कल्पना किंवा ज्ञानाने ओतप्रोत भरलेल्या मनात जेंव्हा "मला" "अमुक तमुक" गोष्टी माहिती आहेत म्हणून "अहंकार" भरलेला असतो, तेंव्हा त्यात भगवंताला आपल्याला बरच काही सांगायचं असून सुद्धा काही नवीन गोष्टी ओतायची जागाच राहत नाही. किंबहुना, त्याला जे सांगायचं असतं आणि आपण आपल्याला जे माहिती आहे म्हणतो, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी एका ठिकाणी राहू शकत नाहीत.


म्हणून मला तर काहीच माहीत नाही म्हणून सगळं विसरून जाता आलं पाहिजे आणि मग आपली पंचेंद्रिय एकवटून त्या परमेश्वराला समर्पण करता आल पाहिजे. आपल्याला मनःशांती हवी असेल तेंव्हा रिकामटेकड होता आलं पाहिजे.

श्रीकृष्णार्पणमस्तु!

94 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page