top of page
Writer's pictureNayanesh Gupte

श्रीकृष्णार्पणमस्तु

मागे एकदा कर्म ( सकाम / निष्काम), भक्ती आणि मंदिर याबद्दल विस्तृतपणे विचार मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भगवद्गीता आणि श्रीमद् भागवत पुराण वाचन जोरात चालू होतं. एका आठवड्यात किंवा कधी २-३ दिवसांत सुद्धा हजार - हजार पानांचे ग्रंथ "तो" वाचून घेत होता. कालांतराने "त्याने" माझं सर्व वाचन थांबवलं. ग्रंथ / पुस्तकांना प्रयत्न करूनही इतक्यात स्पर्श लावण जमलेल नाही. कारण आता परीक्षेची घडी येऊन ठेपली असावी. परीक्षा दालनात पाय ठेवेपर्यंत वाचन केलं तरी शेवटी एकदा प्रश्नपत्रिका हातात आली आपण काय वाचलं होतं आणि त्यातलं नक्की काय लिहायचं आहे हे त्यावेळी नाही आठवलं तर काय उपयोग? आता घडी आहे ती जे वाचलं आहे त्याच चिंतन, मनन करून ते कृतीत उतरवायची.


एकीकडे अधून मधून "Scribbled Thoughts" लेखनात उतरत असतात. लोक वाचतात, कोणाला कधी त्यातून उत्तर सापडली किंवा कोणाला लेख आवडला तर धन्यवाद देतात. त्यांना नक्की काय आणि कसलं उत्तर मिळालं याची मला काहीही कल्पना नसते. पण त्यांचं ते उत्तर देणारा सुद्धा "मी" नाही, माझ्याकडून लिहून घेणारा "तोच". मग ते धन्यवाद मी कसे घेणार. त्यामुळे त्या प्रत्येक धन्यवादामागे असतं एक "श्रीकृष्णार्पणमस्तु!"


पण कधी कधी आपण इतरही काही गोष्टी घेत असतो किंवा आपल्याला अपेक्षेप्रमाणे किंवा अनपेक्षितरीत्या मिळत असतात. त्याला बऱ्याचदा आपली पूर्व पुण्यकर्म कारणीभूत असतात जी आपण त्या वस्तूचा उपभोग स्वतः साठी घेतला की खर्ची होत असतात. ज्याला आपण सुख उपभोगणे म्हणतो.


असाच २-३ दिवसांपूर्वी मला एकमुखी रुद्राक्ष मला भेट म्हणून मिळाला. धारण करण्याआधी तो अभिमंत्रित करावा आणि शिवलिंगाला लावून त्याजवळ ठेवून मग "मी शिवस्वरूप असलेला एकमुखी रुद्राक्ष आजपासून धारण करत आहे. त्यासाठी तुमची संमती द्यावी." असे म्हणून मग तो धारण करावा अशी माहिती त्यासोबत कळली. आज सोमवारचा दिवस बघून पूजा आटोपल्यावर वरील विधी करावा असं डोक्यात होतंच पण अचानक डोक्यात ट्यूब पेटली! स्वतः शिवस्वरूप महाराज स्वतः समोर बसले आहेत. आपण स्वतः धारण करण्याआधी आपण स्वतः शिवस्वरूप असणाऱ्या महाराजांनाच का तो धारण करण्याची प्रार्थना का करू नये? असं म्हणून ते त्यांनाच अर्पण केला. खर तर हा डोक्यात हा विचार भरणारे पण तेच!

आता परत पहल्या परिच्छेदाकडे वळूया. कारण हे वाचन नुसतं वाचन नसून मनाची, कर्माची एक शुद्धीकरणाची प्रक्रिया होती. ज्यातून एक गोष्ट शिकलो ती म्हणजे आपल्याला जे काही चांगलं मिळतं, मग ते कोणाचेही धन्यवाद का असेना, ते त्या परमेश्वराच्या ईच्छेने मिळालं म्हणून त्याला अर्पण करावं आणि काही वाईट झालं तर ते आपल्या कर्माचे भोग म्हणून भोगून संपवाव.


श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत सारख्या अक्षरसत्य ग्रंथात म्हटलंच आहे की हरी आणि हरात भेद करू नका. हृदयात तर त्या कृष्णाचं स्थान आहेच पण हृदयाजवळ असलेला एकमुखी शिवस्वरूप रुद्राक्ष म्हणजे माझ्यासाठी हरीहराच मिलन आहे! त्या रुद्राक्षाचा स्पर्श मी फक्त हे शरीर नाही याची आठवण आहे! शिवोऽहम् शिवोऽहम्।


श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽

Recent Posts

See All

1 Comment


Aishwarya Kamath
Aishwarya Kamath
Jan 03, 2022

🙏🌹.


Once u start following a Guru (in my case after I started with Shreepad Shreevallabh parayan) ones perspective towards life changes.. I agree with yr article 💯%. Its now become a practice, that whatever new purchase or even the 1st bite/ 1st serving is 1st offered to Krishna and then we enjoy the same.

Its always a pleasure reading yr article..

Like
bottom of page